अल्पसंख्यांक मंत्रालयाचं पुस्तक म्हणतं, गोमांस खा! Governement`s book suggests eat a beef

अल्पसंख्यांक मंत्रालयाचं पुस्तक म्हणतं, गोमांस खा!

अल्पसंख्यांक मंत्रालयाचं पुस्तक म्हणतं, गोमांस खा!
www.24taas.com, नवी दिल्ली

शरीरात लोहाचं प्रमाण कमी असेल, तर गोमांस खाण्याचा सल्ला अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या पुस्तकात देण्यात आला आहे. या पुस्तकावर भाजपने आक्षेप घेतला आहे. संसदेतही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

अल्पसंख्यांक मंत्रालयाचने प्रकाशित केलेल्या पोषण या पुस्तकात शऱीरात लोहाचं प्रमाण पुरेसं नसल्यास गायीचं मांस खावं, असा सल्ला दिला आहे. पुस्तकातील असा उल्लेख म्हणजे मतांचं राजकारण असल्याचा आरोप भाजपने केला आहे. लहान मुलांच्या पुस्तकामध्ये गोमांस खाण्याचा सल्ला देणं म्हणजे गोमांस भक्षणाचा प्रचार असल्याचं भाजपने म्हटलं आहे. गोमांस खाण्याला भारतीय संस्कृतीचा आणि राज्यघटनेचाही विरोध आहे.

कायद्याने बंदी असूनही अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने गोहत्या केली जाते. जळगावमध्येही आज अवैधरीत्या गोमांस घेऊन जाणारा ट्रक पकडण्यात आला. अशावेळी गोमांस खाण्याचा सल्ला देणारं पुस्तक हे निश्चितच कायदेभंग करण्यासाठी प्रवृत्त करणार पुस्तक मानलं जाऊ शकतं.

First Published: Thursday, February 14, 2013, 17:42


comments powered by Disqus