Last Updated: Saturday, December 1, 2012, 23:28
www.24taas.com, नवी दिल्लीप्रत्येक ग्राहकाला दरवर्षी मिळणार्या अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची सध्या र्मयादित केलेली सहा ही संख्या वाढविण्याचा सरकार विचार करीत आहे. येत्या काही दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली.
वाढत्या महागाईमुळे पिचलेल्या सामान्य नागरिकाला गॅस सिलिंडरच्या र्मयादेचा निर्णय घेऊन सरकारने आणखी संकटात टाकले आहे. हा निर्णय मागे घ्यावा अथवा अनुदानित सिलिंडरची र्मयादा तरी वाढवावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी केली.
याबाबतीत काय करता येईल यावर पंतप्रधान मनमोहन सिंग व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याशी चर्चा करू. त्यासाठी काही दिवस लागतील, असे मोईली म्हणाले.
First Published: Saturday, December 1, 2012, 23:20