गृहमंत्र्यांना बूट फेकून मारला... आणि बनला दिल्लीचा आमदार!, Grhamantryanna taken a boot cast ... And

गृहमंत्र्यांना बूट फेकून मारला... आणि बनला दिल्लीचा आमदार!

गृहमंत्र्यांना बूट फेकून मारला... आणि बनला दिल्लीचा आमदार!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

पी. चिदंबरम हे देशाचे गृहमंत्री असताना त्यांना एका शीख तरुणानं भर पत्रकार परिषदेत बूट फेकून मारला होता... तो प्रसंग आणि तो तरुण तुम्हाला आठवतो का?... आता का बरं हा प्रसंग आणि त्या तरुणाचा चेहरा आत्ता का आठवावा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर... त्याचं कारण म्हणजे, हाच पी. चिंदबरम यांना बूट फेकून मारणारा शीख तरुण आता दिल्लीचा आमदार झालाय.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत नव्याने संस्थापन झालेला पक्षाला – ‘आम आदमी पार्टी’ला जनतेनं भरघोस मतदान करुन विधानसभेच्या ७० जागांपैकी २८ जागांवर विजय मिळवून दिलाय. याच नव्यानं स्थापन झालेल्या पक्षानं सर्वसामान्य नागरिकांना उमेदवार म्हणून उभं केलं होतं. याच सामान्य उमेदवारांमध्ये जरनैल सिंह हा देखील दिल्ली विधानसभेत ‘आम आदमी पार्टी’ या पक्षाकडून उभा राहिला होता... आणि भरपूर मतांनी विजयीही झालाय. जनरैल सिंह याने त्यांच्याविरुद्ध उभ्या राहिलेल्या भाजपाचे प्रवक्ते राजीव बब्बर यांचा दोन हजार मतांनी दणदणीत पराभव केलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, December 9, 2013, 21:14


comments powered by Disqus