गुजरातमध्ये मतदानाला सुरूवात, Gujarat elections 2012,

गुजरातमध्ये मतदानाला सुरूवात

गुजरातमध्ये मतदानाला सुरूवात
www.24taas.com, अहमदाबाद

गुजरातमध्ये आज विधानसभेच्या 95 जागांसाठी मतदान होणार आहे. दुस-या आणि अखेरच्या टप्प्यातील हे मतदान असणार आहे.

सुमारे दोन कोटी मतदार आपलं बहुमूल्य मत आज देणार आहेत. एकूण 820 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंदीस्त होणार आहे. मध्य गुजरातमधील पाच जिल्ह्यातील 40 जागा, उत्तर गुजरातमधील पाच जिल्ह्यातील 32 जागा, अहमदाबाद शहरातील 17 जागा आणि कच्छ जिल्ह्यातील सहा जागा अशा एकूण 95 जागांसाठी आज मतदान होणार आहे.

मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला, त्यांचे पुत्र महेंद्र वाघेला, श्वेता भट्ट यांच्यासह राज्यातील बडे नेते दुस-या टप्प्यातील निवडणुकीत रिंगणात आहेत. राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.



गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काही प्रमुख लढतींवर सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. त्यातली सर्वात प्रमुख लढत म्हणजे मणीनगरमधली नरेंद्र मोदी आणि काँग्रेसच्या श्वेता भट यांची.

First Published: Monday, December 17, 2012, 08:27


comments powered by Disqus