Hamid Ansari sworn in as 14th Vice President

हमीद अन्सारी यांनी घेतली शपथ

हमीद अन्सारी यांनी घेतली शपथ

www.24taas.com, नवी दिल्ली

देशाचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या पदाची शपथ घेतलीय. भारताचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी दुस-यांदा शपथ घेतली.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी एनडीएचे उमेदवार जसवंतसिंह यांचा पराभव केला. त्यांनी एनडीएचे उमेदवार जसवंत सिंह यांचा २५२ मतांनी पराभव केलाय. हमीद अन्सारींना ४९० मतं मिळाली तर जसवंतसिंहांना २३८ मतं मिळाली.

हमीद अन्सारी यांनी युपीएच्या सर्व घटक पक्षांचा पाठिंबा होता. हमीद अन्सारी हे एस. राधाकृष्णन यांच्यानंतरचे दुस-यांदा उपराष्ट्रपतीपदी निवडून येणारे उमेदवार ठरलेत. हमीद अन्सारी हे देशाचे चौदावे उपराष्ट्रपती झाले आहेत.

First Published: Saturday, August 11, 2012, 13:54


comments powered by Disqus