Last Updated: Friday, March 28, 2014, 21:51
www.24taas.com, झी मीडिया, संगरूरतुमच्या घरातील लहान मुली शाळेत जात असतील, तर ही बातमी वाचून तुम्हांला धक्का बसेल. पंजाबमधील संगरूर येथील मलेरकोटला येथील एका धार्मिक स्थळावर चालणाऱ्या एका शाळेच्या हेडमास्टरविरोधात पाच विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पाचवी शिकणाऱ्या या विद्यार्थीनींच्या पालक जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा ते संतापले. तसेच तो हेडमास्टर पळून गेल्यावर ते अधिकच संतापले. त्यांनी शाळेजवळ आंदोलन सुरू केले. पोलिसांनी पालकांचे म्हणणे ऐकून घेऊन तक्रार नोंदवली. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलींना ब्लॅकमेल करत होता.
हेडमास्टरने धमकी दिली होती की, त्याचे म्हणणे ऐकले नाही तर विद्यार्थीनींना परीक्षेत नापास करणार.... पोलिसांनी या प्रकरणात रेप आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, March 28, 2014, 21:51