अंदमान बोट अपघात: हेल्पलाईन नंबर, इथं साधा संपर्कTwo couples from Thane go missing in Andaman boat t

अंदमान बोट अपघात: हेल्पलाईन नंबर

अंदमान बोट अपघात: हेल्पलाईन नंबर
www.24taas.com, झी मीडिया , अंदमान/ ठाणे

अंदमान निकोबारमध्ये प्रवासी बोट बुडाल्यानं झालेल्या अपघातामध्ये २१ जणांना जलसमाधी मिळालीय. नॉर्थ बे बेटाजवळ अक्वा मरिना ही प्रवासी बोट बुडाली. या बोटीवर ४० प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडू आणि मुंबईतल्या काही प्रवाशांसह क्रू मेंबरचा या प्रवाशांमध्ये समावेश होता.

या दुर्घटनेत ठाण्याच्या रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर भोसेकर आणि त्यांच्या पत्नी अलका यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या दोन मुलांना वाचवण्यात यश आलंय. या बोटीत ठाण्याचे ५ प्रवासी होते, त्यापैकी ३ जणं बचावले असून भोसेकर दाम्पत्याचा मात्र मृत्यू अशी माहितीही समजतीय.

या बोटीतल्या १३ जणांना वाचवण्यातही यश मिळालंय. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वाचवण्यात आलेल्या प्रवाशांना पोर्ट ब्लेयरच्या जी.बी.पंत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलंय. तर याच हॉस्पिटलमध्ये मृतांचं पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.. या बोटीत २५ जणांची क्षमता होती.. मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून आपण माहिती मिळवू शकता.

> 03192-240127
> 03192-230178
> 03192-238881
> जी.बी.पंत हॉस्पिटल - 03192-230629, 9933274092
> स्थानिक हेल्पलाईन नंबर - 102



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 27, 2014, 08:55


comments powered by Disqus