Last Updated: Sunday, October 27, 2013, 15:56
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांच्या बालेकिल्ल्यातून सरकारविरोधात हुंकार भरोचा नारा दिला. पाटण्यातल्या गांधी मैदानात मोदींची हुंकार रॅली पार पडली. यावेळी मोदींनी नितीश कुमार आणि काँग्रेसवर तोंडसुख घेतलं.
नितीश कुमार संधीसाधू असल्याचा हल्लाबोल मोदींनी केला. यावेळी मोदींच्या सभेसाठी लाखोंचा समुदाय उपस्थित होता. मोदींच्या सभेआधी पाटणा आणि गांधी मैदान साखळी स्फोटांनी हादरलं. या स्फोटांचा परिणाम सभेवर होईल असा अंदाज वर्तवला जात होता.
मात्र मोदींची ही सभा शांततेत पार पडली.
शांतपणे मोदींचं भाषण ऐकत जमलेल्या लाखोंच्या समुदायानं समाजकंटकांना एकप्रकारे चोख उत्तर दिलंय.
मोदींच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे -
काँग्रेसनं घराणेशाही सोडावी, मी शहजादा म्हणणं सोडील- मोदी
विश्वासघात्यांचं समूळ उच्चाटन करा- मोदी
पंतप्रधानपदासाठी काँग्रेससोबत केली हातमिळवणी- मोदी
नितीशकुमारांनी बिहारच्या नागरिकांचा केला विश्वासघात- मोदी
नितीशकुमारांना पंतप्रधानपदाचं स्वप्न- मोदी
बिहारमध्ये `जंगल राज` येऊ नये- मोदी
भाजपासाठी पक्षापेक्षा देश मोठा- मोदी
परिवर्तनासाठी भाजपनं मुख्यमंत्रीपद सोडलं
नितीशकुमारांच्या सरकारमध्ये युतीत भाजप मंत्र्यांनीच केलं काम- मोदी
भाजपच्या मंत्र्यांनीच बिहारमध्ये काम केलं- मोदी
नरेंद्र मोदींनी सांगितली श्रीकृष्णाची आठवण
मोदींनी `यादव` मतदारांना चुचकारले
द्वारकेतून येतांना आशीर्वाद घेऊन आलो- मोदी
गुजरात आणि बिहारचं जवळचं नातं
आदर्शांना दगा देणाऱ्या मु्ख्यमंत्र्यांना जनता माफ करणार नाही- मोदी
मोदींनी केला नितीश कुमारांवर आरोप
लोहियांच्या पाठीत खंजिर खुपसला- मोदी
मोदींचा नितीशकुमारांना सणसणीत टोला
`जो `जेपी`ला सोडतो, तो बिजेपीला का नाही`- मोदी
देश हुंकार करु इच्छितो - मोदी
स्वातंत्र्य संग्रामातही बिहारचं योगदान
मोंदीच्या सभेला भोजपुरीचा साज
बिहारला दैदिप्यमान ऐतिहासिक पार्श्वभूमि
मोदींचा नितीशकुमारांना टोला
`बिहार के लोग संधीसाधू नाहीत, काहींना वगळता`
मोदींच्या भाषणाला भोजपुरीत सुरुवात
पाटणा - नितीशकुमारांच्या बालेकिल्ल्यात मोदी!
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 27, 2013, 14:09