Last Updated: Thursday, May 8, 2014, 09:03
www.24taas.com, झी मीडिया, मोहिनुद्दीननगरबिहारच्या उजियापूर मतदारसंघातील मोहिनुद्दिननगर येथे पतीने पत्नीला भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, पत्नीने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला मतदान केले.
‘अब की बार मोदी सरकार’ असे म्हणणाऱ्या पतीचे न ऐकल्याने संतापलेल्या पतीने चक्क पत्नीवर गोळीबार केला. या व्यक्तीचे नाव विनोद पासवान असल्याचे समजते.
गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 7, 2014, 21:17