Last Updated: Friday, October 4, 2013, 14:18
www.24taas.com, वृत्तसंस्था, अहमदाबाददोषी खासदारांच्या वटहुकुमाबाबत वापरलेला `बकवास` हा शब्द चुकीचा होता. आपण शब्द जरी कडक वापरले असले तरी आपली भावना बरोबर होतं असं मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
आपली आई सोनिया गांधी यांनी या चुकीची जाणीव करुन दिल्याचं त्यांनी सांगितलं. दोषी खासदारांबाबत बजावलेला वटहुकूम बकवास आहे, त्यामुळे तो फेकूण द्यावा अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधींच्या टीकेनंतरच केंद्र सरकारने हा वटहुकूम मागे घेतला.
मी तरुण असल्याने तसे घडले असावे, पण माझी भावना तीव्र होती. जे चूक आहे त्यावर बोलणे हे चूक आहे का? भविष्यातही मी असेच बोलणार, असे राहुल यांनी गुजरात दौऱ्याच्यावेळी स्पष्ट केले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, October 4, 2013, 14:18