माझी प्रकृती ठणठणीत - शरद पवार, I am fine say`s Sharad Pawar

माझी प्रकृती ठणठणीत - शरद पवार

माझी प्रकृती ठणठणीत - शरद पवार
www.24taas.com, बंगळुरू

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती खुद्द पवारांनीच `झी २४ तास`ला दिली आहे. मी दररोज दहा ते बारा तास काम करतो.

मसाला पिकाच्या संशोधनासंदर्भात शास्त्रज्ञांसोबत बैठकीसाठी सध्या दक्षिण भारताच्या दौ-यावर असल्याची माहिती पवारांनी दिली. प्रकृतीबाबतच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही पवारांनी `झी २४ तास`च्या माध्यमातून केलं आहे.

तर दुसरीकडे शरद पवार यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. कोणीही अफवा पसरवू नयेत आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानं शरद पवार यांनी पुण्यात आराम केला आणि सध्या ते बंगळूर, म्हैसूर, उटीच्या दौ-यावर असल्याचंही पिचड यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारे कोणी जाणूनबुजून अफवा पसरवत असेल, तर ते राज्याच्या संस्कृतीला शोभणार नाही, असं पिचड यांनी म्हटलं आहे.

First Published: Thursday, March 28, 2013, 18:49


comments powered by Disqus