Last Updated: Friday, November 8, 2013, 18:42
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली ISIच्या मुद्यावरून अडचणीत आलेल्या राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिलंय. मी आचार संहितेचे मी उल्लंघन केलेले नाही. माझ्यासमोर जे तथ्य आले ते मी बोललो.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमधील चुरू आणि मध्यप्रदेशातील इंदूरच्या सभेमध्ये मुजफ्फरनगरचा मुद्दा उपस्थीत करत भाजपवर दंगल भडकवल्याचा आरोप केला होता. काही दंगल पीडित लोक हे पाकिस्तानीतील ISIच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं.
राहुलगांधीच्या या भाषणावर आक्षेप घेत भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्या आधारे निवडणूक आयोगानं राहुल गांधींना नोटीस दिली होती. या नोटीशीला आज राहुल गांधींनी उत्तर दिलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 8, 2013, 18:42