Last Updated: Saturday, January 11, 2014, 08:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआदर्शप्रकरणावरून माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडेंचा तोल सुटलाय... महाराष्ट्र सदनात खोब्रागडे बनावट व्हिसा प्रकरणात अडकलेल्या देवयानी खोब्रागडेंसंदर्भात पत्रकार परिषद घेत होते.
यावेळी त्यांना आदर्श प्रकरणावर एका पत्रकारानं प्रश्न विचारला असता ते भडकले आणि त्यांनी मराठी मीडिया जातीयवादी असल्याचा आरोप केला. तुमची अजून जातीयवादी मनोवृत्ती गेली नाही ती काढून टाका.
देवयानीची माहिती चुकीची नव्हती केवळ तारखेचा घोळ होता. असा खुलासा करत पत्रकारांनाच जातीयवादी ठरवून ते मोकळे झाले. तसंच यावेळी त्यांनी देवयानी खोब्रागडे प्रकरणात मराठीतून प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला....
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 10, 2014, 16:23