Last Updated: Wednesday, September 11, 2013, 18:32
www.24taas.com, झी मीडिया, उदयपूरराजस्थानातील उदयपूर येथील सलूंबर या आदिवासी शेतकरी मोर्चात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराचा आरंभ केला. काँग्रेसला मतं देण्याबद्दल राहुल गांधींनी जनतेला आवाहन केलं.
“यावेळी काँग्रेसने आणलेल्या अन्न सुरक्षा विधेयकाचा हवाला देत राहुल गांधी यांनी आदिवासींना यापुढे पोटभर जेवण मिळणार असल्याची शाश्वती दिली. आता तुम्ही तीन-चार पोळ्या खाऊ शकाल. शंभर दिवस काम करू शकाल. औषधं घेऊ शकाल आणि काँग्रेसला जिंकवू शकाल असं राहुल गांधी म्हणाले. देशाची स्वप्नं पूर्ण व्हावीत, यासाठी मी माझ्या स्वप्नांचा चुराडा करेन. तुम्हाला काँग्रेसला शिव्या घालण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे आम्ही ते स्वीकारणार नाही.” असं राहुल गांधी म्हणाले.
“भारत हा एक पुष्पगुच्छ आहे. यातील प्रत्येक फुल उठून दिसावं, असं मला वाटतं. कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, त्या व्यक्तीचं ऐकून घ्यायला हवं. अन्न सुरक्षा विधेयकामुळे ३-४ पोळ्या खा आणि काँग्रेसला निवडून द्या.” असं राहुल गांधी म्हणाले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 11, 2013, 18:32