भारताची ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी, IAF lands Super Hercules on airstrip near LAC

भारताची ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी

भारताची ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

चीनच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी भारतानं आता ‘सुपर हर्क्युलस’ कामगिरी बजावलीय. भारताचं ` सी-१३० जे सुपर हर्क्युलस` हे बलाढ्य मालवाहू विमान जगातील सर्वांत उंचीवरील दौलत बेग ओल्डी तळावर उतरलंय.समुद्रसपाटीपासून १६ हजार ६१४ फूट उंचावर असलेली ही धावपट्टी सीमारेषे जवळील भागात आहे. हे विमान उतरणं हा चीनला दिलेला अप्रत्यक्ष इशाराच मानला जातोय.

या विमानामुळं सीमेवरील जवानांचं मनोधैर्य वाढण्याबरोबरच सैन्याची ने-आण आणि दळणवळण या बाबी सोप्या होणार आहेत. मंगळवारी पहाटे ग्रुप कॅप्टन तेजबीरसिंग यांनी या तळावर पाऊल टाकलं, असं हवाई दलाच्या निवेदनात सांगण्यात आलंय. या विमानानं हिंडन इथून टेक-ऑफ केलं होतं.

दौलत बेग ओल्डी हे लष्कराचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. चीनच्या रेशीम वाहतुकीच्या प्राचीन मार्गावर ते वसलेलंय. भारत आणि चीनमध्ये १९६२मध्ये झालेल्या युद्धादरम्यान हे स्थान बांधण्यात आलं. 1965 मध्ये पाकिस्तानबरोबरच्या युद्धात हे स्थान वापरलं गेलं होतं. त्यानंतर 2008 मध्ये ‘अँटोनोव्ह-32` हे विमान या तळावर उतरलं होतं.


‘एएन-32` विमानं आणि हेलिकॉप्टरची मर्यादित ओझं नेण्याची क्षमता लक्षात घेऊन ‘सुपर हर्क्यु‘लस` विमान दौलत बेग ओल्डीवर उतरविण्याचा निर्णय हवाई दलानं केला होता. २० टन माल वाहून नेण्याची या विमानाची क्षमता असल्यानं लडाखमधील भारतीय सैन्याला मोठ्या प्रमाणावर रसद पुरवण्यासाठी या विमानाची मदत होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.



First Published: Wednesday, August 21, 2013, 08:49


comments powered by Disqus