Last Updated: Monday, July 29, 2013, 14:32
www.24taas.com , झी मीडिया, लखनऊवाळू माफियांविरुद्ध जोरदार कारवाई करत त्यांचे सर्व अवैध व्यवहार ठप्प केल्याने वाळू माफियांची मक्तेदारी संपुष्टात येत होती. मात्र, या वाळू माफियांना सरकारनेच अभय देण्याचा उद्योग सुरू ठेवल्याचे पुढे आलेय. वाळू माफियांविरुद्ध लढणाऱ्या आयएएस महिला अधिकारी यांना चक्क निलंबित करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात नागपाल यांनी अवैध उत्खनन करणाऱ्या १५ जणांना अटक करण्यास पोलिसांना भाग पाडले होते. तसेच २४ डंपर जप्त केले होते. यमुना आणि हिंडन नदी किनारी अवैध वाळू उपसा करण्यात येत होता.
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील आयएएस महिला अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी वाळू माफियांचा बिमोड करण्यास सुरूवात केली. मात्र, सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेण्याचे सोडून त्यांना निलंबित केले. त्यामुळे आयएएस अधिकारी संतप्त झाले आहेत. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात आयएएस असोसिएशनकडून तातडीची बैठक बोलविली. हे अधिकारी मुख्य सचिवांची भेट घेणार आहेत.
वाळू माफियांविरुद्ध नागपाल यांनी कारवाई करत अवैध व्यवहार ठप्प बंद केलेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वाळू माफिया सक्रीय झाले होते. अखेर रविवारी सरकारकडून त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, वाळू माफियांवरील कारवाईबरोबरच नागपाल यांनी शनिवारी ग्रेटर नोएडा परिसरात सरकारी जमिनीवर अवैधरित्या उभारण्यात आलेली मशीद पाडण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळेच त्यांना निलंबित करण्यात आल्याचे, उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यांचा हा वादग्रस्त निर्णय असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, July 29, 2013, 14:26