.....तर त्यांचेही १० शीर कापून आणा- सुषमा, If Hemraj`s head not returned, bring 10 heads from Pak: Sushma

..तर १० शीर कापून आणा - सुषमा स्वराज

..तर १० शीर कापून आणा - सुषमा स्वराज
www.24taas.com, खैरीआर

भाजप नेता सुषमा स्वराज यांनी सोमवारी म्हटलं की, जर पाकिस्तान शहीद हेमराज याचं शिर परत करणार नसेल तर भारताने पाकिस्तानची १० शिर कापून आणले पाहिजे. असं म्हणत त्यांनी त्यांचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी केंद्र सरकारकडे शेजारील देशाविरोधात कडक कारवाई करावी अशीही मागणी केली.

पाकिस्तानला कोणतेही प्रत्युत्तर न देता आपण केवळ चर्चाच करत रहायची का, हा खरा प्रश्‍न आहे. सरकारने कोणत्‍या तरी पद्धतीने पाकिस्‍तानला उतर दिले पाहिजे. देशाचे लक्ष सरकारकडे कमकुवत सरकार असल्याचे देशासमोर सिद्ध होऊ नका.

त्यांनी सीमा पार करुन आपल्‍या सैनिकांची हत्‍या करुन त्‍यांचे शीर घेऊन गेले. हे सहन करणे अशक्‍य आहे, असे स्‍वराज म्‍हणाल्‍या. सरकारने शहिदाचा अनादर केल्‍याचा आरोपही स्‍वराज यांनी केला. सरकारने शहिदांच्‍या कुटुंबियांची माफी मागावी, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.


First Published: Tuesday, January 15, 2013, 11:32


comments powered by Disqus