मी आईसारखा नाही तर आजीसारखा – राहुल गांधी, Im not like sonia gandhi... im like indira gandhi, says rahul

मी आईसारखा नाही तर आजीसारखा – राहुल गांधी

मी आईसारखा नाही तर आजीसारखा – राहुल गांधी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कंबर कसलीय. त्यांनी सरकार आणि पक्षाच्या सदस्यांना ‘पक्षात अनुशासन हवंच... नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला माफ केलं जाणार नाही’ अशा शब्दांत समज दिलीय.

राहुल गांधी आपण अनुशासनप्रिय आहोत हे सांगताना म्हणतात, ‘मी काँग्रेस अध्यक्षांसारखा (सोनिया गांधींसारखा) कोमल हृद्याचा नाही’ त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या फोटोकडे इशारा करत ‘मी यांच्यासारखा कडक स्वभावाचा आहे’ असं म्हटलंय.

गुरुवारी राहुल गांधी यांनी प्रदेश काँग्रेसच्या ऑफिसमध्ये तीन भागांमध्ये चर्चा केली. त्यानंतर निवडणूक जिंकायची असेल तर सगळ्यांना एकत्र येऊन काम करायलाच हवं, असा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. याचवेळेस दिल्ली नेत्यांना आपल्या घरांतून बाहेर निघून फिल्डवर्क करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 24, 2013, 17:17


comments powered by Disqus