Last Updated: Friday, December 14, 2012, 16:54
www.24taas.com, मडगाव अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत अशीच घटना गोव्यातही घडली आहे. गोव्यात एका अल्पवयीन मुलाने त्याच्याच वर्गमैत्रिणीचा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बलात्कार करुन त्याने तिला त्याच्या एका मित्राकडे सोपविले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. दोघेही आरोपी अल्पवयीन असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपट पाहण्याच्या निमित्ताने दोघंही बाहेर सिनेमागृहात गेले. परंतु, त्यानंतर त्याने सिनेमा हॉलच्या टॉयलेटमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
पोलिसांना त्याने ज्या ठिकाणी बलात्कार केला तो टॉयलेट ब्लॉक दाखविला. मात्र, त्याने दुस-या आरोपीला बोलविल्याचे नाकारले आहे. त्याला तो ओळखतही नसल्याचे सांगतो.
First Published: Friday, December 14, 2012, 16:45