Last Updated: Monday, June 17, 2013, 12:08
www.24taas.com, झी मीडिया, डेहराडून उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने कहर माजवला असून चारधाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे. प्रचंड पावसाचे १० लोक बळी गेलेत तर ५० हून अधिक लोक बेपत्ता झालेत. मुसळधार पावसाने सात मजली इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली.
दरम्यान कुटुंबियांसोबत हेमकुंड साहेबला दर्शनासाठी गेलेला क्रिकेटपटू हरभजन सिंगही पुरामुळे अडकला आहे. आपण सुरक्षित असल्याचे ट्विट त्याने केले आहे
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गंगेसह अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री येथे हजारो नागरिक अडकून पडले आहेत. दरम्यान दरड कोसळण्याच्या दुर्घटनांमुळे काही नागरिक ठार झाल्याचेही वृत्त आहे.
मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र रुप धारण केले असून हृषिकेष, हरिद्वार, हलद्वानी इत्यादी ठिकाणी जनजीवन ठप्प झाले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, June 17, 2013, 12:08