Last Updated: Tuesday, May 14, 2013, 16:28
www.24taas.com, बंगळुरू बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या विवाहाआधी पत्रिका जुळवून वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्समध्ये आलेल्या बाबांचा भलताच थाट-माट आता समोर आलाय. या बाबांचा थाट एखाद्या राजा-महाराजालाही लाजवेल असाच आहे.
आयकर विभागानं जेव्हा या ज्योतिषी महाराजांच्या घरावर छापे मारले तेव्हा आयकर अधिकाऱ्यांचे डोळे पांढरे पडण्याची वेळ आली होती. बंगळुरूपासून जवळचं असणाऱ्या एका बंगल्यात राहणाऱ्या या ज्योतिषी आणि व्यावसायिक स्वामी चंद्रशेखर भट्ट याच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला. अधिकाऱ्यांनी बेडरूममधून तब्बल १५ किलो सोन्याचा बेड, ५० किलो पेक्षा जास्त वजनाची चांदी, गोल्ड बार्स आणि करोडोंची कॅश ताब्यात घेतलीय. स्वामींच्या फक्त उशीखालूनच १५ लाख रुपये मिळाले, यावरून तुम्हीही त्यांच्या संपत्तीचा अंदाजा लावू शकता. स्वामीच्या केवळ बाथरुमसाठी दोन करोडोंचा खर्च करण्यात आलाय. खुद्द स्वामीजीच्या अंगावरही सोनंच सोनं दिसतं. या स्वामीच्या कुर्त्याची बटनंही सोन्याची आणि हिऱ्यांची बनलेली आहेत.
ज्योतिषशास्त्राव्यतिरिक्त चंद्रशेखर बाबांना रिअल इस्टेटमध्येही रस आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्य करोंडोंच्या घेवाण-देवाणीत इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला हा बाबा पडला. जेव्हा टीमनं त्याच्या बंगळुरूतल्या सगळ्यात पॉश भागातल्या १० करोडोंच्या बंगल्यावर छापे मारले तेव्हा त्यांना बीएमडब्ल्यू, लेक्सस आणि बीटलसारख्या लक्झरी गाड्याही पाहायला मिळाल्या.
चंद्रशेखर स्वामी पहिल्यांदा मीडियाच्या नजरेत आला तो अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नाच्या वेळी... जेव्हा त्यानं या दोघांच्या पत्रिका जुळवल्या होत्या. बच्चन परिवाराशी या बाबांची ओळख अमिताभ यांच्या भावानं अजिताभनं करून दिली होती तर ऐश्वर्याचे कुटुंबीय अगोदरपासूनच या स्वामीला ओळखथ होते.
राजकीय, व्यावसायिक आणि फिल्मी जगतात बाबानं चांगलाच जम बसवल्याचं आता उघड झालंय. हाच स्वामी मनी लॉन्ड्रींगशीही जोडला गेल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. चंद्रशेखर स्वामीसोबतच त्याच्या प्रेयसीच्या घरावरही आयकर विभागानं धाड टाकलीय. त्याच्या प्रेयसीचा फ्लॅट जवळजवळ ८० लाखांचा आहे. अधिकाऱ्यांनी जवळजवळ ८ करोडोंची बेनामी संपत्ती ताब्यात घेतलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 15:41