Last Updated: Friday, September 14, 2012, 11:25
www.24taas.com, नवी दिल्ली ‘बालमृत्यू’ हा शब्द भारतीयांना तसा नवीन नाही. आता तर याबाबतीत भारतानं आणखी एक उच्चांक गाठलाय. जगातील सगळ्यात जास्त बालमृत्यूचा आकडा भारतानं गाठलाय आणि याबाबतीत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनलाय.
जगात कुपोषणामुळं होणार पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होतंय. पण भारतात मात्र या आकड्यात दिवसेंदिवस वाढच होतेय. नुकत्याच प्रकाशिक करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालामध्ये हे आकडे प्रसिद्ध करण्यात आलेत. या अहवालानुसार भारतात २०११ मध्ये सुमारे १६ लाख ५५ हजार बालकांचा मृत्यू झालाय. जगातील इतर देशांपेक्षा हे प्रमाण कित्येक पटीनं अधिक आहे. नवजात बालकांचा मृत्यू, न्यूमोनिया, अतिसार आणि कुपोषण अशा महत्त्वाच्या कारणांमुळे हे प्रमाण वाढतानाच दिसतंय.
एक नजर टाकुयात युनिसेफनं प्रकाशिक केलेल्या जगातील बालमृत्यूंच्या आकडेवारीवर (वर्ष २०११) भारत : १६ लाख ५५ हजार
नायजेरिया : ७ लाख ५६ हजार
कांगो : ४ लाख ६५ हजार
पाकिस्तान : ३ लाख ५२ हजार
चीन : २ लाख ४९ हजार
इथिओपिया : १ लाख ९४ हजार
इंडोनेशिया : १ लाख ३४ हजार
बांगलादेश : १ लाख ३४ हजार
युगांडा : १ लाख ३१ हजार
अफगाणिस्तान : १ लाख २८ हजार
First Published: Friday, September 14, 2012, 11:25