Last Updated: Saturday, June 21, 2014, 17:07

www.24taas.com,वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे भाडेवाढीचा कठीण पण योग्य निर्णय घेतला असं म्हणत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज भाडेवाढीच्या निर्णयाला पाठींबा दिला.
आपल्याला जागतीक दर्जाची रेल्वे हवी की खिळखिळी झालेली रेल्वे हवी याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल असं अर्थमंत्री म्हणाले. दरम्यान इंधनाचे भाव उतरले तर प्रवासी भाडेवाढीचा फेरविचार करण्याचे संकेत रेल्वेमंत्र्यांनी दिलेत.
मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाडीच्या निषेधार्थ देशात तीव्र संतापाची लाट उसळली असून. विविध ठिकाणी सरकारविरोधी घोषणा देत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. रेल्वे प्रवासी भाडेवाढ झाली असताना मुंबईतले खासदार करतायत काय असा सवाल मुंबईकरांनी विचारलाय.
मागच्या सरकारने केलेली घाण धुण्याचं काम सरकार करत आहे. रेल्वे भाडेवाढ केली असली तरी आम्ही रेल्वेचा कारभार सुधारू असा दावा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय. तर कुठलीही भाडेवाढ सुखद नसते त्याचं समर्थन होऊ शकत नाही पण रेल्वेला रोज ३० कोटींचा तोटा होतोय. त्यामुळे ही भाडेवाढ अटळ होती असं समर्थन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही दरवाढीला विरोध करत सीएसटीवर निदर्शनं केलीत. तर मनसेने मौन बाळगणे पसंत केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 21, 2014, 17:07