अंदमान निकोबार बेटांवर यापुढील कारगील होईल , India`s next Kargil could happen in the Andaman

अंदमान निकोबार बेटांवर यापुढील कारगील होईल

अंदमान निकोबार बेटांवर यापुढील कारगील होईल


www.24taas.com , झी मीडिया , पणजी

भारतीय माजी नौसेना प्रमुख एडमिरल अरूण प्रकाश यांच्या मते अंदमान निकोबार बेटांवर यापुढील कारगील होईल. राष्ट्रीय स्वयं सेवक संघाच्या सेवाभावी संस्थेने आयोजीत केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना अरूण प्रकाश यांनी हे मत व्यक्त केले आहे.

शिकार, तस्करी, मादक पदार्थांचा व्यापार आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थाने असलेल्या या प्रदेशातून घुसखोरीचे प्रयत्न होणार आहेत. असे सुचक विधान माजी नौदल प्रमुखांनी केले आहे.

भारतीय द्विपकल्पापेक्षा दक्षिण पुर्व आशियाच्यानजीक असल्यामुळे भारताच्या विरोधी राष्ट्रांची नजर या भुभागावर आहे. काही भुभागात दहशतवाद्यानी आश्रय घेतल्याचे अरूण प्रकाश यांनी निर्शनास आणून दिले.

दोन दिवसीय कार्यशाळेत पणजी येथे बोलताना भारताच्या नौदल सामर्थ्य आणि भारताच्या समुद्री सीमांच्या रक्षणाबद्दल चिंता व्यक्त केली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 3, 2014, 20:45


comments powered by Disqus