चीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त,indian army on china border

चीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त

चीनच्या सीमेवर भारताचा कडक बंदोबस्त
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

चीनच्या वाढत चाललेली घुसखोरीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने पाऊल उचलायचे ठरवलेय. सैन्याच्या युद्ध क्षमतेला प्रोत्साहन देत सरकारने एका लष्करी तुकडीला सीमेवर तैनात करण्यास हिरवा कंदील दाखवलाय.

भारताकडून ६५००० कोटी रुपये खर्चून चीनच्या सीमेवर ५० हजार अतिरिक्त सैनिकाची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग याच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळातील सुरक्षा रक्षक समितीने झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला.

या योजनेअंतर्गत १३ लाख सैन्यकर्मचाऱ्यांची सेना पशिचम बंगालमधील पानागढ येथे सैन्य तुकडीचे मुख्य कार्य़ालय चालू करणार आहे. बिहार आणि आसाममध्ये यांच्या दोन तुकड्या असतील तर जम्मू काश्मीर येथील लडाख ते अरुणाचल प्रदेशपर्यंत दुसऱ्या तुकड्या असतील.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 18, 2013, 15:41


comments powered by Disqus