रेल्वे मंत्र्यांच्या राज्यासाठी नव्या घोषणा Indian Railway, State announces new rail

रेल्वे मंत्र्यांच्या राज्यासाठी नव्या घोषणा

रेल्वे मंत्र्यांच्या राज्यासाठी नव्या घोषणा
www.24taas.com, नवी दिल्ती

रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसल्यानंतर राज्यातल्या खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची रेल्वे मंत्र्यांनी दखल घेऊन राज्यासाठी नव्या घोषणा केल्या आहेत.

रेल्वेमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्रावर अन्याय केल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी काही सोयी-सुविधाही दिल्या गेल्या नाहीत. तसेच खास तरतूदही गेली गेली नाही. त्यामुळे सर्वपक्षिय विरोध होत होता. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्या पुढाकाराने रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत नव्याने घोषणा करण्यात आल्या आहेत.

काय मिळालं महाराष्ट्राला

-पुणे-नाशिक नवी लाईन टाकणार

-मनमाड-इंदूर मार्गे धुळे नवीन मार्ग

-एमयुटीपी फेज-२ साठी ६००० कोटी देणार. यात ५० टक्के केंद्र सरकरची मदत असणार आहे.

-दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडोरसाठी ९७५

-पनवेल-अलिबाग ही हार्बर लाईन टाकण्यात येणार आहे.

- इंदूर-पुणे दरम्याने फेऱ्या वाढविण्यात येणार

-मुंबई - वेळंकणी आणि नागपूर-अजमेर या दरम्यान दररोज गाड्या धावतील

First Published: Wednesday, March 13, 2013, 16:31


comments powered by Disqus