भारतीयांचे अपहरण, नातेवाईक चिंताग्रस्त , Indians kidnapped, relatives anxious

भारतीयांचे अपहरण, नातेवाईक चिंताग्रस्त

भारतीयांचे अपहरण, नातेवाईक चिंताग्रस्त
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

इराकमध्ये मोसूल शहरातल्या ४० भारतीय नागरिकांशी भारत सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे इराकमध्ये असलेल्या भारतीयांचे नातेवाईक अतिशय चिंताग्रस्त आहेत.

आपले आप्त इराकमधून सुखरूप परत यावेत यासाठी देवाला साक़डं घातलं आहेच पण सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बेपत्ता असलेले जास्तीत जास्त भारतीय हे पंजाबमधले आहेत. त्याशिवाय काही जण हरयाणा आणि हिमाचलमधलेही आहेत. बेपत्ता असलेल्या भारतीयांचे काही नातेवाईक आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. पंजाब सरकारच्या प्रतिनिधींसोबत त्यांचं एक दल दिल्लीत दाखल झालंय.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल हे सतत केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. तसंच अपहरण झालेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. तर केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर यांनीही केंद्र सरकारचे सर्व पातळींवर प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 12:33


comments powered by Disqus