एटीएममध्ये आता मिळणार २४ तास दूध!, indias first milk atm launched by amul in gujarat

एटीएममध्ये आता मिळणार २४ तास दूध!

एटीएममध्ये आता मिळणार २४ तास दूध!

www.24taas.com, झी मीडिया, आणंद
एटीएममधून आतापर्यंत आपण केवळ पैसे काढले आहेत. आता एटीएममधून दूध मिळणार.... तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, पण हे खरं आहे. गुजरातच्या आणंदमध्ये अमूल डेअरीने एनी टाइम मिल्क (एटीएम) मशीन लावले आहे.

या एटीएममधून ३०० मिलीलीटरचा पाऊच तुम्हांला मिळू शकतो. यासाठी तुम्हांला १० रूपये द्यावे लागते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खेडा आणि आणंद जिल्ह्यात सुमारे ११०० मशीन लावण्याची योजना आहे. याच्या माध्यमातून जास्त जास्त लोकांना या योजनाचा फायदा घेता येणार आहे.

२४ तास चालणारे हे एटीएम खूप हिट होत आहे. अमूल डेअरीने असे आणखी एटीएम बसविण्याचा मानस केला आहे. त्यात फ्लेवर्ड मिल्क, चीज पॅकेट्स आणि चॉकलेट मिळणार आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, January 27, 2014, 21:20


comments powered by Disqus