श्रीलंकन खेळाडूंना आयपीएलमध्ये जयललितांचा विरोध!, IPL matches in TN only if no SL players, umpires`

श्रीलंकन खेळाडूंना आयपीएलमध्ये जयललितांचा विरोध!

श्रीलंकन खेळाडूंना आयपीएलमध्ये जयललितांचा विरोध!

www.24taas.com, चेन्नई
चेन्नईतील आयपीएल सामन्यांमध्ये श्रीलंकन खेळाडू आणि अंपायर सहभाग घेणार असतील तर या ठिकाणी एकही सामना होऊ देणार नाही, अशी कठोर भूमिका तामिळनाडूतील मुख्यमंत्री जयललिता यांनी आज घेतली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूत आयपीएल सामन्यांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाल आहे.

यापूर्वी आयपीएलमध्ये पाक खेळाडूंना खेळू न देण्यावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये बंदी घालण्यात आली होती. अशी काहीशी भूमिका आता जयललिता यानी घेतल्यामुळे श्रीलंकन खेळाडूंच्या खेळण्यावर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

चेन्नईतील आयपीएल सामन्यात जर श्रीलंकन खेळणार असतील, तर चेन्नईत आयपीएलचा एकही सामना होऊ देणार नसल्याचं जयललिता यांनी म्हटलं आहे.

याविषयी मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना पत्र लिहलं आहे. पत्रात केंद्र सरकारने या विषयी बीसीसीआयलाही सूचना देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चेन्नईतील आयपीएल सामन्यात एकही श्रीलंकन खेळाडू, तसेच अंपायर नाहीत, याविषयी खात्री दिल्यानंतरच, चेन्नईत आयपीएल सामने खेळू देणार असल्याचं जयललिता यांनी म्हटलं आहे.
आयपीएलमध्ये श्रीलंकन खेळाडू
लसिथ मलिंगा, जयवर्धने, मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंथा मेंडीस, थिसारा परेरा, अंजलो मॅथ्यूज असे काही खेळाडू गेल्या काही आयपीएलमध्ये विविध संघांचे प्रतिनिधीत्व करतात.

First Published: Tuesday, March 26, 2013, 17:37


comments powered by Disqus