२६ दिवसानंतर... मंगळयान पृथ्वीच्या कक्षेतून पडलं बाहेर!, Isro`s Mars Orbiter ventured out of Earth`s

२६ दिवसानंतर... मंगळयान पृथ्वीच्या कक्षेतून पडलं बाहेर!

२६ दिवसानंतर... मंगळयान पृथ्वीच्या कक्षेतून पडलं बाहेर!

www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं - इस्रोनं - सोडलेलं मंगळयान मध्यरात्री १२ वाजून ४४ मिनिटांनी यशस्वीरित्या पृर्थ्वीच्या कक्षेबाहेर पडलं.

मंगळयानाला मंगळाच्या दिशेने सोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व यांत्रिक बाबी पूर्ण झाल्या. मंगळयान मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा ठप्पा असलेल्या ट्रान्स मार्स इंजेक्शनमधील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. हे इंजेक्शन मंगळयानाला १ डिसेंबर रोजी टोचण्यात येणार आहे. आता सर्व गोष्टी नियोजनाप्रमाणं झाल्यास, पुढील ३०० दिवसात या यानाचा मंगळाच्या दिशेने प्रवास सुरु राहील.

५ नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटाहून ‘पीएसएलव्ही सी २५’ या यानाचं रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यानंतर ते आत्तापर्यंत पृथ्वीच्य प्रभाव कक्षेतच होतं.

सर्व काही सुरळीत सुरू राहूीलं तर हे यान २४ सप्टेंबर २०१४ रोजी संध्याकाळी पावणे सात वाजता मंगळाच्या चारही बाजूंच्या गोलाकार निर्धारीत कक्षेपासून ५० किलोमीटर पुढे किंवा मागे असेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 1, 2013, 08:34


comments powered by Disqus