भारताचं ‘जीएसएलव्ही-डी ५’ आज झेपावणार आकाशात!, ISRO to launch GSLV-D5 today after two failed attempt

भारताचं ‘जीएसएलव्ही-डी ५’ आज झेपावणार आकाशात!

भारताचं ‘जीएसएलव्ही-डी ५’ आज झेपावणार आकाशात!
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

भारताचा ‘जीसॅट-१४’ हा दळणवळण उपग्रह आज अवकाशात झेपावणार आहे. ‘जीएसएलव्ही-डी ५’ (जियो सिंग्क्रनस सेटेलाईट लाँच व्हेईकल) या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून या प्रेक्षपकाचं उड्डाण होईल असं ‘इस्रो`तर्फे सांगण्यात आलंय. ‘जीसॅट-१४’ या उपग्रहाचे वजन १,९८० किलोग्रॅम आहे. मागील वर्षी १९ ऑगस्टलाच होणारे हे उड्डाण इंधनगळती झाल्याने ऐन वेळी रद्द करण्यात आले होते. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीनच्या बरोबरीनं अवकाश क्षेत्रात भारताचं नाव घेतलं जात असलं तरी या अवकाशसत्तांच्या तुलनेत भारत फक्त स्वदेशी क्रायोजेनिक तंत्रज्ञानात आजपर्यंत पिछाडीवर आहे. आज ‘जीएसएलव्ही’चे उड्डाण यशस्वी झाल्यास भारत मोजक्या देशांच्या क्रायोजेनिक क्लबमध्ये भारताचाही समावेश होईल.

‘जीसॅट-१४’ची वैशिष्ट्य पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून...
*’जीसॅट – १४’ झेपावणार अवकाशात

*’जीएसएलव्ही – डी – ५’ प्रक्षेपकामध्ये स्वदेशी बनावटीचं क्रायोजेनिक इंजिन बसविलेलं आहे. प्रक्षेपक उपग्रहाला सूर्यसापेक्ष कक्षेत सोडण्यासाठी वापरला जातोय.

*प्रक्षेपकामध्ये घन,द्रव, क्रायोजेनिक इंधनाचा वापर

*या प्रक्षेपकाचं वजन – ४१४ टन तर उंची – ४९ मीटर आहे.

*१९ ऑगस्ट २०१३ रोजी ’जीएसएलव्ही – डी – ५’ उड्डाणाचा पहिला प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न फसल्यानंतर आज पुन्हा हे उड्डाण होणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 13:12


comments powered by Disqus