जगनमोहन, चंद्रबाबू यांचे आंदोलन चिरडणार?Jaganamohan,Chandrababu`s oscillation will Forcefully Stop

जगनमोहन, चंद्रबाबू यांचे आंदोलन चिरडणार?

जगनमोहन, चंद्रबाबू यांचे आंदोलन चिरडणार?
www.24taas.com , वृत्तसंस्था, हैदराबाद

नव्या तेलंगण राज्या निर्मितीच्या मुद्दावरुन आंध्र प्रदेशात परिस्थिती गंभीर झाली आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन करणारा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय मागे घ्यावा म्हणून उपोषण करणाऱ्या वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वायएस जगनमोहन रेड्डी यांना पोलिसांनी इस्पितळात दाखल केले आहे. तर दुसरीकडे नवी दिल्लीातील आंध्र भवना समोर उपोषणाला बसलेल्या टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू यांचा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे.

सरकार चंद्रबाबू नायडूंना उपोषण ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या विचारात आहे. सरकार नायडूंचे उपोषण तोडण्याच्या तयारीत आहे. आंध्र प्रदेश विभाजनला विरोध म्हणून उपोषण करणाऱ्या तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांनी सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे.

तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी चर्चाद्वारे लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी तेलंगण आणि सीमांध्र यांच्या संयुक्त कारवाई समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. आंध्र प्रदेशात वीज तसेच अन्य महत्वपूर्ण विभागांच्या सरकारी कर्मचारीही आपल्या आंदोलनावर ठाम आहे. संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.

वायएस जगनमोहन रेड्डी यांना पोलिसांनी इस्पितळात दाखल केले असून त्यांना आता निजाम आयुर्विज्ञान संस्थान (निम्स) येथे नेण्यात येणार असल्याचे हैदराबादचे पोलीस उपायुक्त (पश्चिम विभाग) व्ही. सत्यनारायण यांनी सांगितले. जगन हे हैदराबादच्या जुबली हिल्स येथील आपल्या ‘लोटस पॉंड` निवासस्थानी उपोषण करत होते. तेथे पोलिसांनी रात्री ११ च्या सुमारास जाऊन जगन यांना उचलून अम्ब्युलन्समध्ये कोंबले.

वायएस जगन मोहन रेड्डी यांनी सर्व पक्षांना आंध्रला अखंड ठेवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष बोत्सा सत्यनारायण यांनी पंतप्रधांनाना पत्र लिहून तेलंगाणा मुद्दयावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013, 14:54


comments powered by Disqus