जगदंबिका पाल आणि राजू श्रीवास्तव भाजपमध्ये!Jagdambika Pal, comedian Raju Srivastava join BJP, endor

जगदंबिका पाल आणि राजू श्रीवास्तव भाजपमध्ये!

जगदंबिका पाल आणि राजू श्रीवास्तव भाजपमध्ये!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

काँग्रेस नेते जगदंबिका पाल आणि समाजवादी पक्षाकडून मिळालेले तिकीट नाकारणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय. दोघांनाही भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यताय.

जगदंबिका पाल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसपक्षातून राजीनामा दिला होता. त्यांना डुमरियागंज इथून भाजपतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र भाजपचे कार्यकर्ता याचा विरोध करतायेत. तर प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनीही समाजवादी पक्षाची उमेदवारी नाकारत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षानं उमेदवारी दिली होती.

यापूर्वी जगदंबिका पाल यांनी लोकसभेच्या सदस्यतेचाही राजीनामा देत काँग्रेस सोडण्याची घोषणा केली होती. पाल म्हणाले, काँग्रेसला आता माझी गरज नाहीय. जगदंबिका पाल काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. पक्षानं त्यांचा वापर केला पण त्यांना काही दिलं नाही, असंही पाल म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014, 16:55


comments powered by Disqus