Last Updated: Wednesday, September 12, 2012, 12:53
www.24taas.com, हरदा मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील जल आंदोलनाप्रमाणेच हरदा मधील शेतकरीही आपली घरं आणि जमीन वाचवण्यसाठी जल आंदोलन करतायत. इंदिरा सागर धरणाची पाणी पातळी २ मीटरने कमी करावी आणि पूरबाधित लोकांचं पुनर्वसन करावं या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून ३० हून अधिक ग्रामस्थ पाण्याच ठाण मांडून बसलेत. १७ दिवसांच्या आंदोलनानंतर खांडवातील ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देणा-या शिवराज सिंग चौहान सरकारने हरदामधील आंदोलकांवर मात्र कारवाईचे आदेश दिलेत.
प्रशासनानं हरदा जिल्ह्यातील खरदना गावातल्या जल सत्याग्रहींच्या मागण्या साफ धुडकावून लावल्यात. यावेळी पोलिसांच्या मदतीनं ८० लोकांना जबरदस्तीनं पाण्यातून बाहेर काढण्यात आलंय. पाण्याच्या जवळपास बसलेल्या जवळजवळ १०० स्थानिकांनाही हुसकावून लावण्यात आलंय. पाण्यातून बाहेर काढलेल्या जल आंदोलकांना हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलंय. मात्र, याप्रकरणी कुणाला अटक करण्यात येणार का यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.
राज्य सरकारनं जल आंदोलकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी इंदिरा सागर धरणातील पाणी पातळी दोन मीटरने वाढवून २६२ मीटर केल्याने तीन गाव पाण्याखाली गेली आहेत.
First Published: Wednesday, September 12, 2012, 12:53