जसवंत सिंहांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल Jaswant Singh files nomination from Barmer, leaves BJ

जसवंत सिंहांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

जसवंत सिंहांचा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल

www.zee24taas.com, झी मीडिया, जोधपूर

भाजप ज्येष्ठ नेत्यांना डावलण्याचा प्रयत्न करतंय असं म्हणणारे भाजप जेष्ठ नेते जसवंत सिंह यांनी बारमेरहून आज उमेदवारी अर्ज भरलाय. याआधी जसवंत यांनी बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार असे जाहीर केलं होतं. त्याचप्रमाणे जसवंत यांनी आपला उमेदवारीचा अर्ज निवडणूक कार्यालयात भरला.

जसवंत सिंह हे भाजप उमेदवार कर्नल सोनाराम यांच्याविरुद्ध लढणार आहेत. अर्ज भरताना जसवंत यांच्यासोबत भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारीही सामील होते. त्यावेळी त्यांनी जोरदार नारेबाजी आणि घोषणाही केल्या. एकूणच असं समजतंय की, जसवंत यांच्या अपक्ष उमदेवारीनं भाजप चांगलाच अडचणीत सापडेल.

मात्र अजूनही जसवंत सिंह यांनी भाजप पक्ष सोडलेला नाहीय. त्याबद्दल ते चर्चा करुन नंतर निर्णय घेतील असं ते बोलल्याचं समजतंय. अपक्ष लढत असल्यामुळं त्यांना पक्ष सदस्याचा राजीनामा आधी द्यावा लागेल. तसं त्यांनी केलं नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होवू शकते. त्यामुळं जसवंत सिंहाचं आता पुढचं पाऊल काय असेल, भाजप त्यावर काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 24, 2014, 14:01


comments powered by Disqus