Last Updated: Thursday, March 21, 2013, 10:10
www.24taas.com, नवी दिल्ली खासदार रेखा यांचं संसदेत आगमन झालं तेव्हा माझ्यावर कॅमेरे का रोखले गेले, असा प्रश्न विचारणाऱ्या जयाबाई बुधवारी पुन्हा एकदा तापल्या. यावेळी मात्र त्यांचा पारा पत्रकारांमुळे नाही तर एका खासदारामुळेच चढला होता.
झालं असं, की राज्यसभेत बुधवारी सपा, द्रमुक व अण्णाद्रमुकचे सदस्य वेगवेगळय़ा मुद्दय़ांवरून गदारोळ करत होते. त्यामुळे कामकाज तहकूब झाले होते. त्यावेळी काँग्रेचे खासदार प्रदीपकुमार बालमुचू हे सपाच्या खासदार जया बच्चन यांचा मोबाइलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त होते. हा प्रकार जयाबाईंच्या ध्यानात आला, मग काय... जया यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर जोरदार नाराजी व्यक्त केली. लाल झालेल्या जया बाईंचा रंग पाहून काँग्रेस खासदार अंबिका सोनी यांनी बालमुचू यांना या प्रकाराबद्दल माफी मागण्यास सांगितले.
यावर बालमुचू यांनी आपली चूक झाली असं सांगत जयाबाईंची माफीही मागण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा पारा मात्र या माफीमुळे उतरू शकला नाही. त्यानंतर बालमुचू यांनी दुसऱ्या एका खासदाराच्या मदतीनं जयाबाईंचा फोटो आपल्या मोबाईलमधून डिलीट केला.
First Published: Thursday, March 21, 2013, 10:10