जयंती नटराजन यांचा मंत्रीपदाचा राजीनामा!Jayanthi Natarajan quits from Cabinet as Environment Ministe

जयंती नटराजन यांचा मंत्रीपदाचा राजीनामा!

जयंती नटराजन यांचा मंत्रीपदाचा राजीनामा!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

युपीए सरकारच्या केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजूर केला असून नटराजन या आता पक्ष संघटनेच्या कामात लक्ष घालणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसनं सपाटून मार खाल्ल्यानं पक्षात आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या उलथापालथीचे संकेत काँग्रेस नेतृत्वाकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जयंती नटराजन यांचा राजीनामा ही त्याची सुरुवात असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, नटराजन यांच्यानंतर जयराम रमेश आणि सचिन पायलट यांचा नंबर असून ते हायकमांडच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

नटराजन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही वर्णी लावण्यात आलेली नसून पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली हे पर्यावरण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. नटराजन यांच्यावर पक्षातील महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, December 21, 2013, 16:05


comments powered by Disqus