जयाप्रदा चिडल्या, म्हणाल्या कानाखाली देईन, Jayaprada Angry, he`ll Lafa

जयाप्रदा को इतना गुस्सा, कहा लाफा दूंगी

जयाप्रदा को इतना गुस्सा, कहा लाफा दूंगी
www.24taas.com,लखनऊ

अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली नंतर राजकारणात स्थिरावलेली समाजवादी पक्षाची माजी सदस्य जयाप्रदा हिला राग आला. तिचे रागावर नियंत्रण न राहिल्याने पुढे प्रश्न विचारू नका, नाहीतर कानाखाली आवाज काढेन, अशी धमकी एका पत्रकाराला दिली.

जयाप्रदा को कितना गुस्सा है, असं म्हणण्याची वेळ आज उत्तर प्रदेशातल्या देओरियामध्ये आली. जयाप्रदाला पत्रकार, समाजवादी पक्षाबद्दल विचारत होते, त्यावेळी अचानक मॅडमचा पारा चढला. आणि थेट थप्पड मारण्याचीच धमकी त्यांनी दिली. जयाप्रदा म्हणाल्या लाफा दूंगी.

जयाप्रदा तुम्हाला पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, तरीही तुम्ही समाजवादी पक्षाला पर्यायाने मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पाठिंबा देता का? असा प्रश्न विचारताच बाईंचा पार एकदम चढला. शांत राहण्याचा प्रयत्न करीत त्यांनी उत्तर दिले, अखिलेश मेरा भाई जैसा है. पुन्हा प्रश्न आला, तुम्ही आजही समाजवादीला पाठिंबा देता का? त्यावेळी जयाप्रदा संतापल्या. कान के निचे एक दुँगी, असे म्हणत आपला राग व्यक्त केला.

पत्रकारही तेवढाच धिट होता. द्याच कानाखाली, असे म्हणत जयाप्रदा यांना प्रत्युत्तर दिले. त्यावेळी याबाईंनी तेथून काढता पाय घेतला. मात्र, जयाप्रदा का चिडल्या, याचीच चर्चा सुरू होती.

First Published: Tuesday, March 12, 2013, 20:45


comments powered by Disqus