Last Updated: Sunday, June 16, 2013, 17:55
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीजेडीयुनं एनडीए आणि भाजपपासून काडीमोड घेतलाय. भाजपमधील घडामोडी जेडीयुच्या धोरणांशी विसंगत असल्याचं सांगत नैतिकतेच्या आधारावर एनडीएपासून फारकत घेत असल्याची घोषणा जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी केलीय.
एनडीए राष्ट्रीय अजेंड्यापासून दूर झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. शिवाय अटल-अडवाणींच्या काळातला भाजप राहिला नसल्याचं शरद यादव यांनी म्हटलंय. यावेळी शरद यादव यांनी एनडीएच्या समन्वयकपदाचाही राजीनामा दिलाय. याआधी नितीशकुमार यांनी राजभवन इथं जाऊन राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान 19 जूनला बिहार विधानसभेचं अधिवेशन बोलावलंय. यावेळी नितीशकुमार विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत.
त्यामुळं नितीशकुमार बहुमतासाठी आवश्यक आकड्यांची जुळवाजुळव कशी करणार याकडं सा-याचं लक्ष लागलंय. दरम्यान नितीशकुमार यांनी विश्वाघात केल्याचा आरोप बिहारमधील भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, June 16, 2013, 17:55