Last Updated: Wednesday, February 20, 2013, 16:10
www.24taas.com, नवी दिल्लीभारतातल्या विमान प्रवाशांसाठी एक खास बातमी आहे. जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी भारतातली आघाडीची विमान कंपनी जेट एअरवेजनं खास ऑफर सुरु केली आहे.
अवघ्या २२५० रुपयांत विमानप्रवास करता येणार आहे. साडेसातशे ते चौदाशे किलोमीटर अंतरासाठी साडेबावीसशे ते ३ हजार आठशे रुपये तिकीट ठेवण्यात आलं आहे. अशी वीस लाख स्वस्त तिकीट जेट एअरवेज विकणार आहे. २४ फेब्रुवारीपर्यंतही ही खास ऑफर असणार आहे. या ऑफरनुसार ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत तिकीट बुकिंग करता येणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये विमान प्रवाशांची संख्या कमालीची घटली होती. यामुळं नफ्याचं गणितही बिघडलं होतं. नव्या ऑफरमुळं विमान प्रवाशांची संख्या वाढेल शिवाय विमान कंपनीच्या हाती एकगठ्ठा रक्कम पडणार आहे. जेटच्या स्वस्त विमानप्रवासाच्या ऑफरवर प्रवाशांच्या उड्या प़डल्या आहेत.
First Published: Wednesday, February 20, 2013, 15:58