Last Updated: Tuesday, January 29, 2013, 15:46
www.24taas.com, नवी दिल्लीगुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वादग्रस्त नेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, असं विधान कालच यशवंत सिन्हांनी यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. त्यानंतर आज ज्येष्ठ वकील आणि भाजपचे निलंबित नेते राम जेठमलानी यांनीही नरेंद्र मोदींनाच पाठिंबा जाहीर केला आहे.
आज जेठमलानी म्हणाले, की नरेंद्र मोदी हे १००% धर्मनिरपेक्ष असून तेच पंतप्रधानपदासाठी सर्वांत योग्य नेते आहेत. मोदींना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर करणं, हेच भाजपच्या फायद्याचं आहे.
मात्र, या मतप्रवाहाला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने पला पाठिंबा केवळ सुषमा स्वराज यांना दिला आहे. सुषमा स्वराज याच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं मत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.
First Published: Tuesday, January 29, 2013, 15:46