अर्जुन मुंडांनी केली विधानसभा बरखास्तीची शिफारस , Jharkhand: Arjun Munda resigns after withdrawal of support to JMM

अर्जुन मुंडांनी केली विधानसभा बरखास्तीची शिफारस

अर्जुन मुंडांनी केली विधानसभा बरखास्तीची शिफारस
www.24taas.com,रांची

झारखंड मुक्ती मोर्चाच्या शिबू सोरेन यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानं अल्पमतात आलेल्या अर्जुन मुंडा सरकारने विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस राज्यापालांकडे केली. तसंच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही राज्यपालांकडं सोपवलाय.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झारखंड मुक्ती मोर्चाकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेस पाठिंब्याबाबत विचार करेल. असं काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात येतंय. तर राज्यात पुन्हा निवडणुका व्हाव्यात अशी मागणी खुद्द मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी केलीय.

सोमवारी शिबू सोरेन यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता आणि चर्चेचे सर्व दरवाजे बंद झाल्याचं सांगत सरकार पाडण्याचे संकेत दिले होते. हा वाद सुरु झाला तो मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालावरून. भाजपच्या अर्जुन मुंडांनी ठरल्याप्रमाणे २८ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्या नंतर या सत्ता हस्तातंरणावरून दोन्ही पक्षांमध्ये जुंपली होती.

मात्र आता अर्जुन मुंडांना राज्यपालांकडेच विधानसभा बरखास्तीची शिफारस केल्यानं लवकरच झारखंडमध्ये निवडणुका अटळ मानल्या जात आहेत. दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांनी ही राज्यापालांची भेट घेतली.

First Published: Tuesday, January 8, 2013, 17:14


comments powered by Disqus