`आप`चा मोदींना दे धक्का, गुजरातमध्ये `झाडू`, kanubhai kalasariya in Aam Adami party

`आप`चा मोदींना दे धक्का, गुजरातमध्ये `झाडू`

`आप`चा मोदींना दे धक्का, गुजरातमध्ये `झाडू`
www.24taas.com, वृत्तसंस्था, अहमदाबाद

गुजरातमधील भाजपचे आमदार कनुभाई कलसरिया यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केलाय. हा मोदींना धक्का मानला जात आहे.

निरमा सिमेंट प्लँटच्या मुद्यावर गुजरात सरकार आणि मोदी कलसरिया यांनी जोरदार टीकास्त्र केले. कलसरिया यांच्या या निर्णयाने गुजरात भाजपात खळबळ माजली आहे. बुधवारी सकाळी कनुभाई `आप`च्या कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी रितसर पक्षाचे सदस्यत्व स्विकारले. त्यानंतर त्यांनी आपचे चिन्ह झाडू हातात घेतला आणि समर्थकांना अभिवादन केले.

मी तीन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आलो. मात्र पक्षनेत्यांनी एकदाही माझे म्हणणे ऐकून घेतले नाही. आता मी `आप` मध्ये प्रवेश केला आहे. आता मी गुजरातमधील कचरा `झाडू`ने साफ करणार आहे, अशी प्रतिक्रिया पक्ष प्रवेशानंतर त्यांनी दिली.

दरम्यान, गुजरातमध्ये पक्षाचे ८५ हजार प्राथमिक सदस्य झाले आहेत. `आप`ने गुजरातमध्ये जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर कलसरिया यांच्या स्वागतासाठी त्यांचे त्यांचे समर्थक सकाळपासूनच `आप`च्या कार्यालया बाहेर जमा झाले होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014, 08:23


comments powered by Disqus