कारगिल विजय दिवस , Kargil Vijay Diwas - Lest we forget

विजय दिवस, जवानांच्या शौर्याला सलाम

विजय दिवस, जवानांच्या शौर्याला सलाम
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

आज कारगिल विजय दिवस. भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा दिवस. आजच्या दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ रोजी भारतानं कारगिलमध्ये पाकवर ऐतिहासिक विजय मिळवला होता.

ऑपरेशन विजय नावाखाली भारताने ही मोहिम फत्ते केली.. कारगिलमध्ये पाकनं घुसखोरी केली होती.. त्यानंतर हे युद्ध छेडलं गेलं. ६०दिवस चाललेल्या या युद्धात भारतीय जवानांच्या शौर्य आणि आतंरराष्ट्रीय दबावापुढे पाकला गुडघे टेकावे लागले. त्यानंतर पुन्हा एकदा भारताने टायगर हिल्सवर कब्जा मिळवला.

या युद्धात दोन्ही देशांचे जवान शहीद झाले.. कारगिलच्या या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी दरवर्षी २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 26, 2013, 09:57


comments powered by Disqus