सोनिया गांधीना काँग्रेस कार्यकर्त्याकडून नोटीस, Karnataka High Court seeks answers from Sonia Gandhi

सोनिया गांधीना काँग्रेस कार्यकर्त्याकडून नोटीस

सोनिया गांधीना काँग्रेस कार्यकर्त्याकडून नोटीस
www.24taas.com, नवी दिल्ली

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांने अडचणीत आणले आहे. त्यांने दाखल केलेल्या याचिकेनंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने सोनिया यांना नोटीस बजावली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक तिकिट वाटपाच्यावेळी उमेदवारांकडून पैसे घेतले गेलेत, असा आरोप याचिकाकर्ते व्ही शशीधर यांनी केला आहे. याबाबतची याचिका कर्नाटक न्यायालयात दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने सोनिया गांधी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर आणि निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. त्यासाठी न्यालयाने नोटीस बजावली आहे.

याचिकाकर्ते व्ही शशीधर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दावेदारी केली होती. मात्र, पक्षांने त्यांना तिकिट दिले नाही. उलट इच्छुक उमेदवारांकडून १०-१० हजार रूपये वसुल केलेत. शशीधर यांच्या वकिलाने याबाबत याचिका दाखल केली.

शशीधर यांच्या वकिलांने निवडणूक प्रक्रिया रोखण्याची मागणी केली आहे. त्यानुसार न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागविले आहे. दरम्यान, याचिकाकर्त्याने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

First Published: Tuesday, April 9, 2013, 13:01


comments powered by Disqus