मोदींना पंतप्रधानपदी पसंती नाही, 'केजरी' यूटर्न, kejriwal gives upper hand to modi as PM

मोदींना पंतप्रधानपदी पसंती नाही, 'केजरी' यूटर्न

मोदींना पंतप्रधानपदी पसंती नाही, 'केजरी' यूटर्न
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`जर माझ्या डोक्याला कुणी बंदूक लावली... तरच पंतप्रधान म्हणून मी नरेंद्र मोदींना पसंती देईन` असं `आप`चे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं... त्यानंतर काहितरी चुकलंय असं वाटल्यानं अरविंद केजरीवाल यांनी लगेच आपल्या याच वक्तव्यावर घुमजावही केलं.

`समजा तुमच्या डोक्यावर बंदुकीची नळी ठेवली आणि पंतप्रधानपदासाठी तुम्हाला मायावती आणि नरेंद्र मोदी दोघांपैकी एकाची निवड करण्यास सांगितल्यावर काय कराल?` असा प्रश्न केजरीवाल यांना करण्यात आला होता.

तेव्हा `जर माझ्या डोक्याला कुणी बंदूक लावली... तरच पंतप्रधान म्हणून मी नरेंद्र मोदींना पसंती देईन` असं उत्तर केजरीवाल यांनी दिलं. आगामी निवडणुकीनंतर त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असे भाकीत वर्तवितानाच जबरदस्ती झाल्यास मोदी यांना पसंती देऊ, असंही केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्यानंतर लगेचच केजरीवाल यांनी आपण अशाप्रकारचे कोणतेही विधान केले नसल्याचे केजरीवालांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्पष्ट केले. आपण केवळ प्रसारमाध्यमांकडून ट्विटरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मोदींचे नाव घेतल्याचं स्पष्टीकरण केजरीवाल यांनी दिलं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 14:47


comments powered by Disqus