Last Updated: Wednesday, October 31, 2012, 11:00
www.24taas.com, नवी दिल्लीसामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल हे आज पुन्हा एकदा भ्रष्टाचारावर नवा खुलासा करण्यासाठी तयार झाले आहेत. बुधवारी त्यांनी ट्विट केलं, “आज नवीन खुलाशासाठी तयार राहा. आजचा आरोप खूप मोठा असू सकतो.”
केजरीवाल आज नेमक्या कोणत्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार आहेत, हे गुलदस्त्यात ठेवलं आहे. यावेळी पण आरोप करणार असलेल्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवून त्यांनी लोकांची उत्सुकता वाढवली आहे. मात्र केजरीवाल यावेळी कुणावर निशाणा साधतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे.
यापूर्वी रॉबर्ट वडेरा आणि नितीन गडकरी यांना गोत्यात आणल्यावर केजरीवाल आज नवा खुलासा करायला समोर येणार आहेत. आज संध्याकाळी ४ वाजता कंस्टिट्युशन क्लबमध्ये यासाठी केजरीवालांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. भ्रष्टाचाराविरोधी आवाज उठवणारे आणि राजकीय पक्ष स्थापनेकडे वाटचाल करणारे अरविंद केजरीवाल स्वतःही राजकारणात चांगलेच माहिर होत चालल्याचं दिसत आहे.
First Published: Wednesday, October 31, 2012, 11:00