केजरीवाल यांचा वीज-पाणी सत्याग्रह..., kejriwal light - water andolan

केजरीवाल यांचा 'वीज-पाणी सत्याग्रह...'

केजरीवाल यांचा 'वीज-पाणी सत्याग्रह...'
www.24taas.com, नवी दिल्ली
‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’नं शनिवारी वीज-पाण्याच्या वाढलेल्या बिलांचा विरोध करत वीज-पाणी सत्याग्रहाला सुरुवात केलीय. या सत्याग्रहाची सुरुवात करताना आयएसीच्या कार्यकर्त्यांनी वीज बील न भरू शकलेल्या एका कामगाराच्या घराची कापलेली वीज पुन्हा जोडली.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या टीम सदस्यांसहित दक्षिण दिल्लीतील टिगरी कॉलनीमध्ये जाऊन एका कामगाराच्या घरी वीज कनेक्शन पुन्हा सुरु केलंय. या कामगाराचं मागच्या महिनन्याचं वीजबील १५ हजार रुपये आलं होतं. एव्हढं वीजबील भरणं त्याच्यासाठी केवळ अशक्य गोष्ट होती. त्यामुळे त्याच्या घराची वीज कापली गेली होती. केजरीवाल यांनी या कामगाराच्या घराचा वीज पुरवठा पुन्हा सुरू केला आणि पुन्हा हा वीज पुरवठा बंद करण्यात आला. या पद्धतीनं आपण सविनय मार्गानं सरकारचा निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी इतर लोकांनाही आवाहन करत, ‘हे कृत्यं केवळ जागरुकतेसाठी आहे... सगळ्यांनी भयमुक्त होण्याची गरज आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आपल्याला एकजुटीनं विरोध करायला हवा’ असं म्हटलंय.

First Published: Sunday, October 7, 2012, 08:56


comments powered by Disqus