खुर्शीद हिम्मत असेल तर येऊन दाखवा- केजरीवाल, kejriwal on salman khurshid

खुर्शीद हिम्मत असेल तर येऊन दाखवा- केजरीवाल

खुर्शीद हिम्मत असेल तर येऊन दाखवा- केजरीवाल
www.24taas.com, नवी दिल्ली

हिम्मत असेल तर सलमान खुर्शिद यांनी जंतर-मंतर इथं येऊन आपल्याशी जाहीर वादविवाद करावा, असं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिलंय. अपंगांचा निधी त्यांनी खाल्लाय. त्यांना याचा जाब द्यावाच लागेल, असंही केजरीवाल म्हणाले. आज सकाळी परदेश दौ-यावरून खुर्शिद दिल्लीला परतले, त्यावेळी काळे झेंडे घेऊन त्यांच्या स्वागताला टीम केजरीवाल हजर होती. खुर्शिद यांच्या राजीनाम्याची मागणी निदर्शक करत होते.

जोपर्यंत खुर्शिद राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत निदर्शनं सुरू राहतील, असं केजरीवाल यांनी जाहीर केलंय. खुर्शिद आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते केजरीवालांच्या आरोपांना उत्तरं देतील, अशी शक्यता आहे. दुसरीकडे सलमान खुर्शिद यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाबाहेर केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

पोलिसांनी या निदर्शकांना पांगवलं. त्यांच्या निवासस्थानाला पोलिस छावणीचं स्वरूप आलंय. केजरीवाल यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घराजवळ फिरकू देण्यात येत नाहीये...

First Published: Sunday, October 14, 2012, 13:30


comments powered by Disqus