"ज्या विषयातलं कमी कळतं, त्यावर मोदींनी बोलू नये!" Khurshid slams Modi

"ज्या विषयातलं कमी कळतं, त्यावर मोदींनी बोलू नये!"

www.24taas.com, झी मीडिया, सुरत

परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदींनी टीका केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. ज्या विषयातलं ज्ञान मर्यादित आहे, त्याबद्दल बोलू नये, असा टोमणा मारत खुर्शीद यांनी मोदींना ‘सल्ला’ दिला आहे.

“ज्या क्षेत्रात मोदी स्वतःला यशस्वी मानतात, त्या क्षेत्रांबद्दलच त्यांनी बोलावं. ज्या क्षेत्राशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही, ज्या क्षेत्रात त्यांचं काडीमात्र योगदान नाही, त्या मुद्यांवर नरेंद्र मोदींनी बोलू नये. ज्या क्षेत्राबद्दल त्यांचं ज्ञान मर्यादित आहे, त्या विषयावर मोदींनी बोलू नये. इतरांना त्यांची कामं त्यांनी करू द्यावीत” असं परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद म्हणाले.

अमेरिका मोदींना वीजा देण्यास नकार दिला आहे. या गोष्टाचा उल्लेख करत खुरशीद म्हणाले, की जर एखादा देश मोदींना आपल्याकडे येऊ देत नसेल, तर त्या मागच्या कारणांचा मोदींनी विचार करावा. जर एखाद्या देशात तुम्हाला प्रवेश मिळत नसेल, तर त्याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. असंही खुर्शीद यांनी मोदींना टोला लगावला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, May 13, 2013, 16:37


comments powered by Disqus